मुख्य पृष्ठ > मुंबई पुरालेखागार विभाग

मुंबई पुरालेखागार विभाग

  • मोडी हस्तलिखिते

    या ठिकाणी इंग्रजी राजवटीपासून सरकारच्या विविध खात्यांचे रिपोर्टस, डायरीज, फाईल्स,टाईप बाऊंड बुके यांचा अद्यावत असा प्रचंड संग्रह आहे. तसेच मोडी कागदपत्र संग्रह ठेवण्यात आलेला आहे. त्याची रूमाल संख्या १३५४ आहे. यात सांगली पटवर्धन, चांदवड,औंध, शिर्के, मेणवली, निरंतर(नाशिक),सावंतवाडी, मुरूड जंजिरा, अलिबाग दप्तरे शिवाय संकार्ण दप्तरे धरून एकूण ६७ दप्तरांचा समावेश आहे. तसेच तंजावर येथील भोसले घराण्याच्या मोडी दप्तराच्या अंदाजे २५० रूमालातील कागदपत्रांच्या सुक्ष्मचित्रफीती आहेत.

  • इंग्रजी हस्तलिखिते

    सन १६३० पासून १८२० पर्यंत ईट इंडिया कंपनीच्या डायऱ्या असून त्यांची संख्या सुमारे ७००० आहे. सन १८२० नंतर सरकारच्या प्रत्येक खात्याच्या कारभाराचा पत्रव्यवहार व्हॉल्युम स्वरूपात आहे. आणि सन १९२० नंतर पासूनचा आजपर्यंतचा शासकीय पत्रव्यवहार फाईलीच्या स्वरूपात जतन करून ठेवण्यात आलेला आहे. याखेरीज वृतपत्रांच्या फाईली, जुने नकाशे इत्यादीचा समावेश आहे.