मुख्य पृष्ठ > कोल्हापुर पुरालेखागार विभाग

कोल्हापुर पुरालेखागार विभाग

 • या दप्तरखान्यात कोल्हापूर छत्रपतींचे दप्तर आहे. त्यात पोलिटिकल रेकॉर्डस, सनदा, बारनिशी, पुस्तके, सरंजाम पट, राजपत्रे इत्यादी स्वरूपाचे अभिलेख आहेत. याखेरीज हिंमत बहाद्दर चव्हाण, खर्डेकर, कापशीकर इत्यादी जहागिरदारांसंबंधीचा पत्रव्यवहार आहे. कागदपत्रांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

 • हुजूर खाजगी

  महाराजांच्या खाजगी खात्याचे व १८ कारखाने यांचे हिशेब वगैरे.

 • जमेनिशी

  संस्थानच्या सर्व खात्याच्या हिशेबाचे कागद

 • हुजूर खजिना

  संस्थानाच्या खजिना खात्याचे हिशेबाचे कागद

 • किल्ले

  किल्ले आणि पागा कि्ले आणि पागा यांच्या हिशेबाचे कागद

 • मुख्य कारभारी जमाबंदी

  मुख्य कारभाऱ्याकडील हिशेबासंबंधी

 • पारसनिशी, निवडी आणि चिटणीशी (ब्रिटाशपुर्व)

  पत्रे, आज्ञापत्रे, पत्रव्यवहार विशेषतः संस्थानाधिपती आणि त्यांचे जहागिरदार

 • कैफियती

  सरंजामदार, इनामदार , वतनदार यांनी इनाम कमिशनपुढे (१८४५-४८) लेखी म्हणणे मांडले ते.

 • पेटा आणि हुजूर दफाता

  सन १८४४ पुर्व गावगन्ना हिशेबाचे पत्र आणि महसुलासंबंधीचे कागदपत्र

 • रवासुदगी

  राजमंडळाची जावक बारनिशी

 • जमाबंदी

  किल्ले आणि महाल यांचे हिशेब

 • फारसी कागद

  निजाम, हैदरअली आदी मुसलमान सत्ताधिशांशी पत्रव्यवहार व काही फारसी हस्तलिखिते

 • किरकोळ

 • फायली, पत्रे वगैरे

  संस्थानाधिपतीचा सन १९०५ पासून पुढील पत्रव्यवहार

 • मिरज येथील चिटणीशी रूमाल

  पटवर्धनानी कर्नाटकात लढाया मारल्या त्याची वर्णने , जमीन महसूल आणि रोजकीर्द

 • कुरूदंवाड

  ऐतिहासिक पत्रव्यवहार, संस्थानाचे हिशेबव जमीन महसूल यासंबंधी

 • कागल दप्तर

  कागल जहागिरीतील गावगन्नाचे हिशेब व जमीन महसूल